दीड वर्षांनंतर फरार आरोपी सापडला

 Ghatkopar
दीड वर्षांनंतर फरार आरोपी सापडला
दीड वर्षांनंतर फरार आरोपी सापडला
See all

घाटकोपर - गेल्या दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला चिरागनगर पोलिसांनी पकडले. ज्वेलर्स व्यवसायिकाच्या दुकानात नोकरी करणाऱ्या अविनाश राज कुलाल (२१) वर्षे याला ८० लाख रुपये देऊन व्यवसायकाने त्यांच्या भावाकडे पाठवले होते. पण, आरोपी व्यवसायिकाच्या भावाकडे न जाता आपल्या गावी पळून गेला. या आरोपीवर पोलिसांनी कलम ४०८ गुन्हा आंतर्गत अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ४५,५०,००० हजार, आय पॅड आणि बाइक जप्त केली आहे. ज्वेलर्स व्यवसायिकांनी गेल्या वर्षी जून महिन्यात आरोपी विरूद्ध तक्रार दाखल केली होती. पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत तेंडुलकर, विनायक बाबर आणि कमलेश कुसाळकर यांनी आरोपीला पकडण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Loading Comments