सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हाती

कस्तूरबा - कस्तूरबा पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केलीय. जोगेश्वरी डेपो परिसरात जुलैमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने योगेश उर्फ जोग याला अटक केलीय. जुगार खेळण्यासाठी त्यानं आतापर्यंत दिवसधवळ्या अनेक चोऱ्या केल्या आहेत. कांदिवली, दिंडोशी, समता नगर, मालाड, कुर्ला आणि वांद्रे या परिसरात त्याच्याविरोधात चोरीच्या अनेक तक्रारी दाखल आहेत. आतापर्यंत त्याने दोन लाखाहून अधिक रोकड आणि पाच तोळे दागिने चोरले आहेत.

Loading Comments