पोलिस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

या मार्शल्सना कोरोना काळात नियमभंग करणा-यांवर कारवाई करण्याचे काम देण्यात आले होते.

पोलिस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
SHARES

गुन्ह्यात आरोपी असलेल्या कंत्राटदाराला मदत करणयाच्या नावाखाली २० हजार रुपयांची लाच स्विकारताना चारकोपच्या एका पोलिसउपनिरीक्षकाला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. भारत ढेंबरे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- नव्या वर्षाच्या पहिल्या तारखेपासून सर्वांसाठी लोकल ट्रेन?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कंत्राटदार असून तो महापालिकेसाठी क्लीनअप मार्शल पुरवत होता. या मार्शल्सना कोरोना काळात नियमभंग करणा-यांवर कारवाई करण्याचे काम देण्यात आले होते. त्यावेळी कांदिवली येथील कारवाईनंतर त्याचे काही नातेवाईत कंत्राटदाराच्या घरी पोहोचले. त्यावेळी हाणामारी झाली. त्यावेळी दंड ठोठावण्यात आलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्याप्रकरणी कंत्राटदार व त्याच्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटदार व त्यांच्या भावांना अटक केली. पोलिसांनी त्यावेळी कंत्राटदाराचा मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. त्याप्रकरणी फोन परत देण्यासाठी २० हजार तसेच वडिलांवर याप्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागण्यात अशी ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी मध्यस्थी करणा-या व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा