परदेशातून येणाऱ्यांसाठी भारताची दार बंद, पोलिसांनी व्हिजा नाकारले

पोलिसांनी 15 एप्रिलपर्यंत कुणाला ही व्हिजा न देण्याचा निर्णय

परदेशातून येणाऱ्यांसाठी भारताची दार बंद, पोलिसांनी व्हिजा नाकारले
SHARES

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अन्य देशांतून येणाऱ्यांना व्हिसा देणे बंद करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी 15 एप्रिलपर्यंत कोणालाही व्हिजा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्यांनी अर्ज केला आहे. किॆवा ज्यांना तारखा मिळाल्या आहेत. त्यांना ही कार्यालयात न येण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

देशात कोरोना या संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोराना बाधित रुग्णांचा आकडा आता 49 वर जाऊन पोहचला आहे. खबरदारी म्हणून मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना शक्य तितके बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तर शाळा, महाविद्यालय आणि दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन या पूर्वीच ठाकरे सरकारने घेतले आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत परदेशातून आलेल्या लोकामुळेच हा संसर्ग रोग पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे.49 पैकी दोन जण सोडली तर सर्व रुग्ण परदेशातून आले असल्याचे पुढे आले आहे.

पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरात 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश दिलेले आहेतच, तसेच परदेशातून येणाऱ्यांना ही विलगीकरण कक्षात ठेवले जात होते. माञ परिस्थिती आणखी चिगळू नये म्हणून पोलिसांनी आता परदेशातून भारतात म्हणजेच मुंबईत येणाऱ्यांना आता व्हिजा नाकारला आहे. पोलिसांनी 15 एप्रिलपर्यंत कुणाला ही व्हिजा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पञक काढून पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे.




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा