भांडुप पोलिसाचा हार्टअटॅकनं मृत्यू

 Bhandup
भांडुप पोलिसाचा हार्टअटॅकनं मृत्यू
भांडुप पोलिसाचा हार्टअटॅकनं मृत्यू
See all

भांडुप - भांडुप पोलीस ठाण्यातील आणखी एका ४८ वर्षीय पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. विष्णू रावजी कुंदे असं या पोलिसाचं नाव आहे. त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी ईगतपुरीतल्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी पहाटे पाच वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबियांनी पहिल्यांदा मेट्रो आणि त्यानंतर रुक्मीणी हास्पीटलमध्ये दाखल केले. मात्र डाक्टरांनी कुंदे यांना मृत घोषीत केले.

कुंदे हे कल्याणमधील चक्की नाका परिसरात राहतात. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असं कुटुंब आहे. 1989 मध्ये कुंदे शिपाई म्हणून पोलीस दलात रुजू झाले. चांगली कामगिरी पाहता त्यांना जून 2012 मध्ये कुंदे यांची भांडुप पोलीस ठाण्यात सहायक उप पोलीस निरिक्षक पदावर नेमणूक करण्यात आली.

Loading Comments