'त्या' गँगचा पर्दाफाश

 Pali Hill
'त्या' गँगचा पर्दाफाश
'त्या' गँगचा पर्दाफाश
See all

मुंबई - बनावट चेक बनवून सामान्यांना कोट्यवधींचा गंडा घलणाऱ्या टोळीचा वरळी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या टोळीनं आत्तापर्यंत 150 जणांची दीड कोटींची फसवणूक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. यामध्ये टोळीच्या सात सदस्यांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 62 बॅंकांचे 550 चेक, 19 चेकबुक्स, 10 डेबिट कार्ड, लॅपटाप आणि महत्त्वाचे दस्तावेज हस्तगत केलेत.

या प्रकरणी पोलिसांनी आसिफसह कुरीयर बॉय चंद्रकांत नांगरे, बनवाट खातेधारक आरोपी आकाश राज मुलचंद उर्फ सुनिलकुमार सिंग, बनावट खाते उघडून देणारा आकाश हरीश रातचंदानी, एटीएमवरून पैसे काढणारा काफी अब्दुल शेख उर्फ सोनू यादव आणि या चैघांचा म्होरक्या फैजान रहमान शेख याला बेड्या ठोकल्या आहेत. यातील काही आरोपींविरोधात वर्सोवा तसंच डोंगरी पोलीस ठाण्यात देखील गुन्हे नोंदवलेले आहेत.

Loading Comments