वडाळ्यात 'रेझिंग डे‘ निमित्त रॅली

 wadala
वडाळ्यात 'रेझिंग डे‘ निमित्त रॅली
वडाळ्यात 'रेझिंग डे‘ निमित्त रॅली
वडाळ्यात 'रेझिंग डे‘ निमित्त रॅली
वडाळ्यात 'रेझिंग डे‘ निमित्त रॅली
वडाळ्यात 'रेझिंग डे‘ निमित्त रॅली
See all

वडाळा - महाराष्ट्र पोलीस दलातर्फे 'रेझिंग डे' सप्ताह साजरा करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर सोमवारी वडाळा रोड स्थानकात जनजागृती रॅली काढण्यात आली होती. सीताराम प्रकाश सेकंडरी हायस्कूलच्या नववीतील 30 विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी यात सहभाग घेतला होता. या वेळी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाची आणि शस्त्रांची माहिती देण्यात आली.

'रेझिंग डे' निमित्त 2 ते 7 जानेवारी दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पोलीस उपनिरीक्षक सदाशिव खोत, हवालदार मंगेश साळवी, कमांडो संतोष गव्हाणे, प्रवीण साळसकर, अमोल पिसे, गोविंद जाधव, सागर भोळे, मुकुंद कोकणे, सविता मेस्त्री आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Loading Comments