या पोलिस अधिकाऱ्याचे कुख्यात गुंडाशी संबध

याच गुंडांच्या अफरातफरीतून त्या पोलिस अधिकाऱ्याने बक्कळ संपत्ती उभी केल्याचा आरोप पालांडे पञाद्वारे केला आहे.

या पोलिस अधिकाऱ्याचे कुख्यात गुंडाशी संबध
SHARES
मुंबई पोलिस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे अंडरवल्डशी घनिष्ठ संबध असल्याचा आरोप सिरियल किलर विजय पालांडेने केल्यानंतर पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या भूवया उंचावल्या होत्या. पालांडेने या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याविरोधात दिल्लीतील मुख्य दक्षता आयुक्तांकडे(सीव्हीसी) केलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी सोमवारी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानंतर पालांडेला जबाबासाठी मुंबई पोलिसांकडे हजर करण्याचे आदेश कारागृह विभागाला दिले होते. त्यानुसार त्याचा जबाब नोंदवण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

ओशिवऱ्यातील ज्येष्ठ नागरिक अरुणकुमार टिकू आणि बुकी करण कुमाप कक्कड यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पालांडेला अटक केली. न्यायालयाने त्याला तळोजा येथील कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले. कारागृहात बंदी असताना.  त्याने 31 डिसेॆबर 2018 मध्ये पोलिस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे अंडरवल्ड सोबत घनिष्ठ संबध असल्याचे आरोपकरत, सोबत पुरावे जोडले होते. त्यात त्याने पालांडेला शहरातील बडे व्यावसायिक आणि धनाड्य व्यक्तींचे नाव, पत्ते, मोबाइलनंबर आणण्यास सांगितले होते. ही माहिती तो अधिकारी अंडरवल्ड डाँन यांना देऊन त्यांच्या मदतीने खंडणी गोळा करायचा असा आरोप पञात केला आहे. त्याच बरोबर छोटा राजनचा थायलंडमधील हस्तक संतोष शेट्टी, राजनशी सतत संपर्कात राहणारा हबीब फारूखी, सुधाकर शेट्टी, फरीद तनाशाची हत्या करणारा राजनचा खास हस्तक विजय शेट्टी यांच्या हा अधिकारी संपर्कात होता. ऐवढेच नाही तर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, छोटा शकिल यांच्या टोळीत काम करणाऱ्या अहमद लंगडा, सलीम महाराज, सलीम प्रूट, वांद्रे येथील बिलाल आणि उमर चिक्कू यांच्याशी ही संबध ठेवून होता.

याच गुंडांच्या अफरातफरीतून त्या पोलिस अधिकाऱ्याने बक्कळ संपत्ती उभी केल्याचा आरोप पालांडे पञाद्वारे केला आहे. हे पञ पालांडेने केंद्रीय गृहविभाला दिले. या पञाची प्रत सोशल मिडियावर वायरल झाल्यानंतर विविध चर्चांना उधान आलं,  याप्रकरणी चौकशी करण्यास राज्याच्या गृहविभागाला सांगण्यात आले होते. तेथून हे प्रकरण पोलिस महासंचालक कार्यालय व तेथून ते मुंबई पोलिसांकडे चौकशीसाठी आले होते. पालांडे सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे 14 फेब्रुवारीला याप्रकरणी गुन्हे शाखेने विजय पालांडेचा जबाब नोंदवण्याची आवश्‍यकता असल्यामुळे त्याला 17 फेब्रुवारीला उपलब्ध करण्याची विनंती न्यायालयात होती. या विनंती अर्जावर न्यायालयाने होकार दर्शवत 24 फेब्रुवारीला पालांडेला जबाबासाठी मुंबई पोलिसांना उपलब्ध करून देण्याचे आदेश कारागृह विभागाला दिले होते. त्यानुसार सोमवारी हा जबाब नोंदवण्यात आला आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  

 गॅंगस्टर संतोष शेट्टीला चार वर्षांपूूर्वी भारतात डिपोर्ट करण्यात आले होते. पालांडे याच्याविरोधात तीन हत्या केल्याचा आरोप आहे. 2012 च्या दुहेरी हत्येप्रकरणी पालांडेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तो सध्या नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहे. सिरियल किलर म्हणून समोर आलेल्या पालांडे गुन्हे शाखेच्या तावडीतून पळाला होता. राञी 11 वाजता त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चर्चगेटहून अटक केली. त्यापूर्वी तो एका आयपीएस अधिकाऱ्याला भेटला. या भेट्टीचे दृष्य सीसीटिव्ही कैद झाले आहेत. तसेच  अंडरवल्रडशी संबध ठेवून असलेला हाच पोलिस अधिकारी मला भेटायला चर्चगेट येथे आल्याचा आरोप पालांडेने पञाद्वारे केला आहे. तसेच त्या वेळेचे संभाषण आणि  व्हिडिओ रेकाँर्डिंग ही पालांडेकडे असल्याचा दावा त्याने केला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा