3 कोटी 40 लाखांसह, 608 अवैध घड्याळे जप्त

 Fort
3 कोटी 40 लाखांसह, 608 अवैध घड्याळे जप्त

सीएसटी - मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट येथील फातिमा मंझिल कम्पाउंड येथून सुमारे 3 कोटी 40 लाखांची 608 घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. काही सुप्रसिद्ध ब्रँड्सच्या घड्याळ्यांची जप्त केलेली घड्याळं ही फर्स्ट कॉपी आहेत. माता रमाबाई आंबेडकर ठाण्यातील पोलिसांनी ही कारवाई केलीय. या प्रकरणी सलिम मोहम्मद फर्निचरवाला आणि मोहम्मद अकबर सलीम फर्निचरवाला यांना पोलिसांनी अटक केलीये. हे दोघेही दिव्याचे रहिवासी असून, वर्षभरापासून ते ही बनावट घड्याळं विकत होते. यांसंबंधीची तक्रार युनायटेड ओव्हरसीज ट्रेडमार्क या कंपनीनं पोलिसांना केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Loading Comments