कुख्यात गुंडाचे या राजकिय नेत्यांशी जवळचे संबध…पहा फोटो !

तारिक पोलीस यंत्रणांना २० वर्षांपासून गुंगारा देत होता,

कुख्यात गुंडाचे या राजकिय नेत्यांशी जवळचे संबध…पहा फोटो !
SHARES

भारतातील अंडरवल्ड डॅान आणि राजकिय नेत्यांचे संबध हे काही नवीन नाही. नुकतीच अटक करण्यात आलेल्या तारिक परवीन याच्या अटकेनंतर हा मुद्दा पून्हा एकदा उजेडात आला आहे. तारिकचे ठाण्यासह त्याचे इतर राज्यात त्याचे राजकिय पुढाऱ्यांशी असलेल्या संबधावरून पून्हा एकदाचर्चांना उधाण आले आहे. त्याचे नेमके कोणा कोणाशी किती जवळचे संबध आहेत. ते पाहूया…


 कुख्यात गुंड दाूऊद इब्राहिमचा खास हस्तकांपैकी एक म्हणून तारिक परविनची ओळख आहे.  १९९८ मध्ये मुंब्रा येथे केबल वॉर मधून झालेल्या दोघांच्या हत्येप्रकरणी तारिकच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. मुंब्रा येथे तारिक परवीनने मोहम्मद इब्राहिमसोबत केबल व्यवसाय सुरू केला, मात्र धंद्यातील वैमनस्यातून तारिकने त्याच्या हस्तकांकरवी मोहम्मदवर अंदाधुंद गोळीबार केला. यात मोहम्मद आणि परवेज अन्सारी या दोघांचा मृत्यू झाला तर या गोळीबारात एका लहान मुलीच्या मांडीत गोळी घुसली. या घटनेनंतर तारिक पोलीस यंत्रणांना २० वर्षांपासून गुंगारा देत होता, मात्र त्याने मुंबईच्या जी. टी. हॉस्पिटलजवळ असलेल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये काही दिवसांपूर्वी त्याच्या बांधकाम व्यवसायासाठी कार्यालय सुरू केले होते. 


 ऐकीकडे तारिकचे गुंडांशी असलेले संबध तर दुसरीकडे राजकिय पुढाऱ्यांशी असलेली जवळीकता. यावरून त्याच्या ताकदीचा अंदाज आपल्याला आलाच असले. तारिकच्या अटकेनंतर त्याचे राजकिय पुढाऱ्यांशी असलेले संबध आणि फोटो सोशल मिडियावर वायरल होऊ लागले आहेत. तारिकसोबत फोटोमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याही समावेश आहे. एका पार्टीत तारिक त्यांना घास भरवतानाचा फोटो वायरल होत आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्यासोबत त्याचे दोन ते तीन फोटो वायरल होत आहेत. त्यात अबू आझमीच्या मांडीला मांडीलावून आझमी हे गप्पमा मारताना दिसून येत आहे. त्याच बरोबर एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या खांदयावर हात ठेवून फोटो काढतानाचा तारिक परविनचा फोटो वायरल झाला आहे. त्याच बरोबर सत्ताधारी शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगर पालिकेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांच्यासोबत ही त्याचा फोटो वायरल होत आहे. 

 

तारिक परविनसोबतच्या फोटोमुळे आता हे सर्व नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मूळातच पोलिसांनी त्याला २० वर्ष फरार असे घोषित केले होते. पहिल्यांदा त्याला २० वर्षानंतर ठाण्याच्या मुंब्रातून अटक केली होती. पोलिसांच्या तो हाती लागत नसल्याचे वृत्त होते. मात्र राजकिय पुढाऱ्यांसोबत अनेक कार्यक्रमात तो बिनदास फिरत होता. 

 

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा