टपाली मतदानात मुंबई-ठाणे पोलिस अग्रेसर

पोलिसांना मतदानासाठी काही वेळ सूट दिली जाते; पण अनेक पोलिस मुंबईबाहेर मतदानाचा हक्क बजावतात. मुंबईबाहेरील मतदारसंघांत अनेकांची नोंद असते. अशा परिस्थितीत त्यांना मतदानाचा हक्क बजावणे शक्‍य होत नाही.

SHARE

विधानसभा निवडणुकीसाठी टपाली मतदान करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जांमध्ये यंदा २० पटींनी वाढ झाली आहे. मुंबईत सुमारे ५० हजार पोलिस आहेत. त्यातील १० हजारांहून अधिक जणांनी टपाली मतदानासाठी अर्ज केला आहे. तर ठाणे पोलिसांनी ९२ टक्के टपाली मतदानाद्वारे मतदान केलं आहे.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई आणि ठाणे पोलिसांनी टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. मतदारसंघातच बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना मतदानासाठी काही वेळ सूट दिली जाते. पण अनेक पोलिस मुंबईबाहेर मतदानाचा हक्क बजावतात. मुंबई बाहेरील मतदारसंघांत अनेकांची नोंद असते. अशा परिस्थितीत त्यांना मतदानाचा हक्क बजावणे शक्‍य होत नाही. त्यामुळे अशा पोलिसांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था केली जाते. दरवर्षी सुमारे ५०० पोलिस टपाली मतदानासाठी अर्ज करतात; पण यंदा आतापर्यंत १० हजारांहून अधिक जणांनी अर्ज केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. टपाली मतदानासाठी पोलिस ठाण्यांतच अर्ज उपलब्ध करण्याची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. तसेच, कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये याबाबत जागृती करण्याचीही सूचना असते.

ठाणे पोलिसांनीही यंदा टपाली मतदानाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला. ठाणे पोलिस आयुक्तालयात नेमणुकीला असलेल्या ९२८४ पोलिसांपैकी यंदा ८५६३ जणांनी टपाली मतदान केले. त्यामुळे एकूणच ९२.१२ टक्के टपाली मतदान केले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित विषय
ताज्या बातम्या