मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा पुण्यातून अटकेत

मंत्रालयात बाँम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल पुण्यातून आल्याचं स्पष्ट झालं आहे.

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा पुण्यातून अटकेत
SHARES

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेल द्वारे देण्यात आली. या धमकीनंतर एकच खळबळ उडाली. यानंतर संपूर्ण मंत्रालयाची तपासणी करण्यात आली. धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे.

मंत्रालयात बाँम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल पुण्यातून आल्याचं स्पष्ट झालं आहे. शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शैलेश शिंदे याच्या मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही. या कारणामुळे म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला, असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल पाठवल्याप्रकरणी पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या शैलेश शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. शैलेश शिंदे यानं पाठवलेला मेल सांयकाळी ६.२० ला प्राप्त झाला होता अशी माहिती आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालायत यापूर्वी देखील बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवली होती. एका अज्ञात व्यक्तीनं मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब (Bomb) ठेवल्याचं सांगितलं. यानंतर सुरक्षायंत्रणा कामाला लागल्या होत्या.

मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचं स्पष्ट झालं. नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणानं हा दूरध्वनी केला होता. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये दुपारी पाऊणच्या सुमारास हा फोन आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू झाली होती.

मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आलं होतं. यासाठी डॉग स्क्वाड देखील बोलवण्यात आले होते. मात्र, सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. दरम्यान, या निनावी दूरध्वनीनंतर मंत्रालयाच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली होती.Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा