दहिसरमध्ये कुत्र्याच्या पिल्लाचा शिरच्छेद, गुन्हा दाखल

दहिसर भागात तीन महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लाचं शिरच्छेद करण्यात आल्याचं समोर आलं.

दहिसरमध्ये कुत्र्याच्या पिल्लाचा शिरच्छेद, गुन्हा दाखल
SHARES

रविवारी, २७ डिसेंबर रोजी दहिसर भागात तीन महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लाचं शिरच्छेद करण्यात आल्याचं समोर आलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई अ‍ॅनिमल असोसिएशन (MAA)च्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी एफआयआर दाखल केली आहे. वृत्तानुसार, कुत्र्याच्या पिल्लांचं धड समाज कल्याण हॉल रोडच्या मागे, जरी मारीच्या बागांच्या जवळ, आनंद नगर, दहिसर इथं आढळलं.

सहायक पोलिस आयुक्त (लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो) सुधीर कुडाळकर यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, “प्राणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मला या भयानक क्रूरतेची माहिती कळवली. त्यानंतर मी दहिसर पोलिस ठाण्यातील पोलिसांशी बोललो. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

दुसरीकडे यापूर्वी महाराष्ट्रातील ठाणे इथल्या विष्णू नगर पोलिसांनी एका भटक्या कुत्र्याला छळ केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीस अटक केली होती. वृत्तानुसार, प्राणी कल्याण कार्यकर्त्यानं त्या व्यक्तीला कुत्र्याचा छळ करताना पकडले आणि त्यानंतर त्याच्या सहकार्याच्या मदतीनं आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

रामसमझ तिल्थू चौहान असं आरोपीचे नाव असून तो डोंबिवलीतील आंबेडकर नगर इथला रहिवासी आहे. आरोपीवर आता प्राणघातक प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा