खंबाटा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं विमानतळावर आंदोलन


SHARE

विले पार्ले - १९६७ सालापासुन विले पार्ले येथे कार्यरत असलेली खंबाटा कंपनी आर्थिक नुकसानामुळे अलिकडेच बंद पडल्याने खंबाटाच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कामगारांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा रस्ता रोखून ठेवला होता. बी.डब्लु.एफ.एस. या नवीन कंपनीने खंबाटा कंपनी विकत घेतली. परंतु खंबाटामधील सर्वच कर्मचाऱ्यांना नोकरी न देता थोड्याच कर्मचाऱ्यांना बी.डब्लु.एफ.एस मध्ये नोकऱ्या दिल्या गेल्या. उर्वरित कर्मचारी बेरोजगार झाल्यानं कंपनी विरुद्ध आंदोलन करण्यात आलं. ३००० हुन अधिक कर्मचारी रस्त्यावर आंदोलनासाठी उतरल्याने विमानतळाजवळ वाहतूक कोंडी झाली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या