रियल लाइफ स्पायडरमॅन

कुर्ला - बुधवारी संध्याकाळी कोहिनूर सिटीमधील एका इमारतीच्या 10 व्या मजल्यावर आग लागली. आग लागताच, इमारतीतील लोक जीवाच्या भितीने बाहेर आले. त्याच इमारतीच्या 12 व्या मजल्यावर एक महिला आपल्या मुलासोबत अडकली होती. किमान आपलं बाळ वाचावं यासाठी ती त्या मुलाला खाली फेकायलाही तयार होती... इतक्यातच तिथून जाणाऱ्या विनोद पवार या रियल लाइफ स्पायडरमॅननं जीवाची पर्वा न करता जोखीम उचलली, भिंतींवरून वर चढून त्या मुलाला घेऊन हा रिअल लाइफ स्पायडरमॅन पाइपच्या आधारे खालीही उतरला... त्यानंतर आलेल्या फायर ब्रिगेडच्या टीमनं त्या महिलेचीही सुखरूप सुटका केली.

Loading Comments