एटीएम फोडणारा आरोपी अटकेत

 Shivaji Nagar
एटीएम फोडणारा आरोपी अटकेत

शिवाजीनगर - गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात डीसीबी बँकेचं एटीएम मशीन फोडणाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलीय. रिझवान खान (३०) असं या आरोपीचं नाव आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. सोमवारी रात्री शिवाजीनगर पोलीस गस्त घालत असताना त्यांना डीसीबी बँकेच्या एटीएमचं दार उघडं दिसलं. त्यांनी पाहाणी केली असता, एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचं लक्षात आलं. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानं पळून जाताना रिझवान त्यांच्या हाती लागला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली.

Loading Comments