तरुणावर लुटारुंचा हल्ला

 Ghatkopar
तरुणावर लुटारुंचा हल्ला

सह्याद्रीनगर - मित्राला सोडून घरी जात असलेल्या 34 वर्षीय तरुणावर दोन लुटारुंनी प्राणघातक हल्ला केला. लुटारुंनी त्याच्याकडून 2000 रुपयांचा मोबाईल आणि दिडशे रुपये घेऊन पळ काढला. गोपाळ माने असं या तरुणाचं नाव आहे. लुटारुंनी केलेल्या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. त्याच्या डोक्यावर मार लागल्याने 18 टाके पडले आहेत. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू असल्याचं भांडुप पोलिसांनी सांगितले. गोपाळ माने हा आई आणि भावंडासोबत भांडुपच्या सह्याद्रीनगर परिसरात राहतो. 

Loading Comments