मुलांना उडवल्याप्रकरणी सलमान खान अटकेत


मुलांना उडवल्याप्रकरणी सलमान खान अटकेत
SHARES

मानखुर्द - शाळेत जात असताना तीन शाळकरी मुलांना 'ओला'कारने धडक दिल्याची घटना सोमवारी मानखुर्दमध्ये घडली. ही घटना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. यामध्ये अन्सिका यादव,महिमा यादव आणि गणेश यादव ही तीन शाळकरी मुले जखमी झालीत. या तिघांनाही गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, महिमा आणि अन्सिका हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कारचालकाचा सहकारी सलमान हाजी खान याला पोलिसांनी अटक केली आहे. 12 वर्षीय अल्पवयीन चालक कार शिकत असताना हा अपघात झाल्याची माहिती झोन सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली. या अल्पवयीन कारचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा