विमानतळ परिसरात देशीकट्यासह घुसण्याचा प्रयत्न, चालकाला अटक

गाडीत लपवण्यात आलेला देशी कट्टा आढळून आला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून हरविंदरने शेखला ताब्यात घेत, पोलिस आणि विमानतळावरील इतर सुरक्षा रक्षकांना सतर्क केले.

विमानतळ परिसरात देशीकट्यासह घुसण्याचा प्रयत्न, चालकाला अटक
SHARES

 मुंबईच्या अतिसंवेदनशील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो संकुल परिसरात देशी कट्यासह प्रवेश करू पाहणार्या एका चालकाला सहार पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल रहमान शेख (३२) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणामागील त्याचे नेमकं उदिष्ठ काय होते, याची माहिती आता सहार पोलिस घेत आहेत.


देशी कट्यासह घुसण्याचा प्रयत्न

भिवंडीच्या घुंगटनगर, जनता हाँटेलमध्ये राहणारा आरोपी शेख हा शनिवारी विमानतळाच्या कार्गो विभागात सामान सोडणाऱ्या गाडीवर चालक होता. तो त्याची गाडी एअर कार्गो संकुलच्या गेट नं ४ मधून विमानतळ परिसरात आत घेत होता. त्यावेळी गस्तीवरील खासगी कंपनीचे सुरक्षा रक्षक हरविंदर सिंग याला तपासणी दरम्यान त्याच्या गाडीत लपवण्यात आलेला देशी कट्टा आढळून आला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून हरविंदरने तातडीने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने शेखला ताब्यात घेत, पोलिस आणि विमानतळावरील इतर सुरक्षा रक्षकांना सतर्क केले.


गुजरातहून केली देशी कट्याची खरेदी

विमानतळाच्या कार्गो परिसरात देशी कट्यासह एक व्यक्ती घुसल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. सहार पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने शेखला अटक करत, त्याला विमानतळ परिसरातून हलवले.   पोलिसांनी शेखकडे केलेल्या चौकशीत त्याने तो देशी कट्टा गुजरातच्या पंचमहल परिसरातील ‘हलोल-कलोल’  येथून ८५० रुपयांना खरेदी केला असल्याची माहिती दिली. मात्र त्याचे विमानतळ परिसरात हे अग्नीशस्त्र घेऊन जाण्यामागील उदिष्ठ अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

हत्या करून आत्महत्येचा बनाव, एकाला अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा