हत्या करून आत्महत्येचा बनाव, एकाला अटक

बेशुद्ध अवस्थेत असलेला विजेंद्र शुद्धीवरच न आल्यामुळे त्या दिवशी नेमके काय घडलं, त्याने का आत्महत्येचा प्रयत्न केला. याचे नेमकं कारण कळू शकले नाही.

हत्या करून आत्महत्येचा बनाव, एकाला अटक
SHARES

किरकोळ कारणांवरील वादातून मानखुर्दमध्ये काही टोळक्यांनी एका ३६ वर्षीय तरुणाला इमारतीवरून फेकत त्याची हत्या करत, ती आत्महत्या असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला. विजेंद्र ऊर्फ राज सिंग असे मृत व्यक्तीच नाव आहे. मात्र आरोपींचे हत्या करण्याबाबतचे संभाषण एका सतर्क महिलेने ऐकून याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर या हत्येचा उलघडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.


नेमके काय घडलं, त्या दिवशी

मानखुर्दच्या एमजीपी काँलनी परिसरात विजय मंगल सोसायटीत विजेंद्र त्याच्या कुटुंबियांसोबत रहायचा. दारूच्या आहारी गेलेला विजेंद्र कायम इमारतीच्या गच्चीवर झोपायचा. ५ एप्रिलला रात्री पावणे बाराच्या सुमारास सिंगने नशेतून इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी टाकत आत्महत्या केली. याची माहिती मिळताच कुटुंबियांनी विजेंद्रला तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र अधिक उपचारासाठी विजेंद्रला राजावाडी रुग्णालयातून भायखळाच्या जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. बेशुद्ध अवस्थेत असलेला विजेंद्र शुद्धीवरच न आल्यामुळे त्या दिवशी नेमके काय घडलं, त्याने का आत्महत्येचा प्रयत्न केला. याचे नेमकं कारण कळू शकले नाही. उपचारादरम्यान ९ एप्रिल रोजी विजेंद्रचा मृत्यू झाला.  अखेर कुटुंबियांच्या जबाबानुसार याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.


आत्महत्या नसून ती तर हत्याच

ज्या दिवशी विजेंद्रने आत्महत्या केली. त्याच दिवशी मयूर सोसायटीमध्ये राहत असलेल्या विनायक उर्फ विनोद राजा गौड(२५) हा त्याच्या आणखी २८ वर्षीय साथीदारालाशी "राज ने निचे झगडा किया, उसको छोडेंगे नही' असे बोलत असल्याचे एका महिलेने ऐकले. त्यानंतर दोनही आरोपी राज झोपलेल्या गच्चीच्या दिशेने गेले. त्यावेळी सहाव्या मजल्यावरही गेल्यानंतर आरोपी राजचा शोध घेत असताना दोघांनी पाहिले. त्यावेळी राज हा सातव्या मजल्यावरील गच्चीवर झोपला असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी विजेंद्रला गच्चीवरून खाली फेकून त्याची हत्या करत तेथून पळ काढला. या दोघांना त्यावेळी कुणीच न पाहिल्यामुळे नशेत विजेंद्रने हत्या केल्याचा समज सर्वाना झाला. मात्र इमारतीतील महिलेच्या सतर्कतेमुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे पुढे आले. अखेर याप्रकरणी गौडला याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. हत्येतील त्याचा दुसरा साथीदार हा एड्‌सग्रस्त आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.


हेही वाचा

रुग्णाचे एटीएमकार्ड घेऊन केअरटेकर फरार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा