विक्रोळीतील दुचाकी चोरी सीसीटीव्हीत कैद

 Tagore Nagar
विक्रोळीतील दुचाकी चोरी सीसीटीव्हीत कैद
विक्रोळीतील दुचाकी चोरी सीसीटीव्हीत कैद
See all

टागोरनगर - अज्ञात चोरट्यानं दुचाकी लंपास केल्याची घटना सोमवारी विक्रोळीच्या टागोरनगमध्ये घडली आहे. इथल्या ग्रुप क्र. 1 मध्ये राहणाऱ्या मिनाक्षी धिलीवाल यांची ही स्कुटी आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधाक गुन्हा दाखल केला आहे. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गाडीचा क्रमांक आणि सीसीटीव्ही फुटेजमधील चोराच्या हालचालींवरून त्याचा शोध सुरू असल्याचं विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव जाधव यांनी सांगितलं.

Loading Comments