Advertisement

नौदल गोदीत गोळी लागून सुरक्षा रक्षक ठार

अखिलेश यादव हा गुरुवारी सायंकाळी नियमित कर्तव्यावर होता. यावेळी गोळी लागून तो कोसळल्याचं आढळलं.

नौदल गोदीत गोळी लागून सुरक्षा रक्षक ठार
SHARES
Advertisement

पश्चिम कमांडचे मुख्यालय असलेल्या नौदल गोदीत गोळी लागून सुरक्षा रक्षक ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. अखिलेश यादव असं या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे.  गुरुवारी सायंकाळी यादव कर्तव्यावर असताना ही घटना घडली. 

अखिलेश यादव हा गुरुवारी सायंकाळी नियमित कर्तव्यावर होता. यावेळी गोळी लागून तो कोसळल्याचं आढळलं. त्यानंतर त्याला तात्काळ आयएनएचएस अश्विनी या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गोळी कशी लागली हे मात्र निश्चीत झालं नाही. ही गोळी कदाचित त्याच्याच बंदुकीतून लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. . नौदल तसंच पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

अखिलेश हा आयएनएस आंग्रे या पश्चिम कमांडचे मुख्यालय असलेल्या भागात तैनात होता. ही जागा सुरक्षेच्यादृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला बाहेरून गोळी लागली असल्यास ही एक भीषण व धक्कादायक बाब  असेल. परंतु रात्री उशिरापर्यंत हे स्पष्ट झालं नव्हतंं.हेही वाचा -

घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक

मुंबईसह राज्यात प्राप्तीकर विभागाचे ३७ ठिकाणी छापे
संबंधित विषय
Advertisement