घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक

वॉचमन व सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या बिल्डिंगमध्ये ते सेल्समन असल्याचे सांगून प्रवेश करून घरफोडी करत.

घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक
SHARES

फ्लॅट, बंद दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या टोळीला गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षाने जेरबंद केलं आहे.  मालमत्ता कक्षाने दोन भावांसह आणखी एकाला अटक केली आहे. त्यांनी मुंबई व परिसरात अनेक घरफोड्या केल्याचं उघडकीस आलं आहे. 

ज्ञानशेखर आप्पादुराई शेट्टी (३७, रा दिवा, ठाणे), मोहन आरमुगम शेट्टी (२७, रा. कांजूरमार्ग) आणि त्याचा भाऊ लोकनाथ उर्फ आरमुगम (२३) अशी आरोपींची नावे आहेत. वॉचमन व सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या बिल्डिंगमध्ये ते सेल्समन असल्याचे सांगून प्रवेश करत.  कटावणी व स्क्रू डायव्हरच्या साहाय्याने फ्लॅटचे दरवाजे उचकटून ते घरफोडी करत.  विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड कांजूरमार्ग परिसरात घरफोडी करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. 

यावेळी तिथे संशयास्पदरीत्या वावरत असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे कटावणी, स्क्रू ड्रायव्हर सापडले. चौकशीमध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी माहीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक फ्लॅट फोडून ७० सोने तोळे व रोकड लंपास केल्याची कबुली केली.  यातील ज्ञानेश्वर शेट्टी याच्याविरुद्ध मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी घरफोडी, दरोडा, जबरी चोरी आदीचे ३५ गुन्हे दाखल आहेत. मोहन शेट्टीवर १६ तर त्याचा भाऊ लोकनाथ यांच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत. 



हेही वाचा  -

मुंबईसह राज्यात प्राप्तीकर विभागाचे ३७ ठिकाणी छापे

मध्य रेल्वेकडून 'इतक्या' मुलांची घरवापसी




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा