शबानांना वाचवण्यासाठी दोन कि.मी.धावला सुरक्षा रक्षक!

वाहनात अभिनेत्री शबाना आझमी असल्याचे त्यांना समजले. शबाना आझमी अपघातानंतर बेशुद्ध झाल्या होत्या. घटनास्थळी उपस्थित दोघांच्या मदतीने योगे यांनी शबाना यांना गाडीतून बाहेर काढले.

शबानांना वाचवण्यासाठी दोन कि.मी.धावला सुरक्षा रक्षक!
SHARES
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचे प्राण वाचवण्यासाठी तब्बल २ कि.मी. धावणार्‍या जवानाचा गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्र सुरक्षा दलात (एमएसएफ) काम करणार्‍या या जवानाचे नाव विवेकानंद योगे असे आहे. योगे यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, लाइफ सेव्हिंग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने संयुक्त पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत योगे यांना सन्मानित केले.
हेही वाचाः- महिला आयोगाच्या अध्यक्ष रहाटकर यांची सुप्रीम कोर्टात धाव

अभिनेत्री शबाना आझमी  (Javed Akhtar Shabana Azmi accident) यांच्या वाहनाला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अलीकडेच अपघात झाला होता. या अपघातात आझमी गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एका वाहनाला अपघात झाल्याची माहिती सर्वप्रथम योगे यांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच योगे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. यासाठी ते तब्बल दोन कि.मी. अंतर धावले. अपघातस्थळी पोहोचताच अपघात झालेल्या वाहनात अभिनेत्री शबाना आझमी असल्याचे त्यांना समजले. शबाना आझमी अपघातानंतर बेशुद्ध झाल्या होत्या. घटनास्थळी उपस्थित दोघांच्या मदतीने योगे यांनी शबाना यांना गाडीतून बाहेर काढले. याचदरम्यान रुग्णवाहिकेशी संपर्क करत योगे यांनी द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचे व्यवस्थापनही केले.

हेही वाचाः-रस्त्यावर खड्डे आढळल्यास कंत्राटदार जबाबदार- महापालिका

गेल्या दोन वर्षांपासून विवेकानंद योगे महाराष्ट्र सुरक्षा दलात काम करत आहेत. शबाना आझमी यांच्या अपघाताचे फोटो व्हायरल झाल्यानंतर योगे यांचा शोध सुरू झाला. लष्करी गणवेशामुळे योगे यांचा शोध महाराष्ट्रातील सेनेच्या सर्व मुख्यालयात घेण्यात आला. मात्र, त्यांना योगे यांचा शोध लागला नाही. अखेर शबाना आझमी यांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधून योगे यांचा शोध घेण्यात आला.
 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा