टाटासमूहाच्या रक्षकांची छायाचित्रकारांना मारहाण!

मस्जिद - बॉम्बे हाउसबाहेर शुक्रवारी तीन वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली. टाटा समूहाचे निलंबित अध्यक्ष सायरस मिस्त्री बॉम्बे हाउस या टाटा समूहाच्या मुख्यालयात येणार असं समजल्यामुळे तिथे छायाचित्रकार पोहचले होते. मात्र तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून त्यांना रस्त्यावर बेदम मारहाण करण्यात आली. मोबाइलच्या क्लिपमध्ये छायाचित्रकारांना झालेली मारहाण चित्रित करण्यात आली आहे. त्यात हे रक्षक छायाचित्रकारांना अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. मारहाणीत जखमी झालेल्या छायाचित्रकारांना सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आलं असून, या मारहाणीविरोधात ते पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. आतापर्यंत या मारहाणीचं कारण कळू शकलेलं नाही. दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Loading Comments