उर्वशी चुडावालाला न्यायालयाचा दिलासा

अर्ज मंजूर करताना उर्वशीने १२ व १३ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात हजेरी लावून सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

उर्वशी चुडावालाला न्यायालयाचा दिलासा
SHARES

देशद्रोही शर्जिल इमाम याच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या उर्वशी चुडावालाला मुंबई उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला आहे. १ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी उर्वशी चुडावालासहित अनेक जण या आंदोलनात सहभागी झाले होते. न्यायमूर्ती एस.के.शिंदे यांनी उर्वशीचा अटकपूर्व जामीन २५ हजाराच्या जातमुचलक्यावर मंजूर केला आहे. अर्ज मंजूर करताना उर्वशीने १२ व १३ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात हजेरी लावून सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

 हेही वाचाः- वजन कमी करण्याच्या गोळ्यांनी तरुणीचा मृत्यू

 मुंबई प्राइड सॉलिडेटरी गॅदरींग निमित्ताने काही विद्यार्थ्यी 1 फेब्रुवारी रोजी आझाद मैदान येथे जमले होते. त्यांचे नेतृत्व उर्वशि चुडावाला करित असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जमलेल्या विद्यार्थ्याॆनी सीएए, आणि एनआरसी विरोधात घोषणाबाजी केली. त्याच वेळी त्यांनी जेएनयूचा विद्यार्थी नेता शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा ही दिली. या घटनेची गंभीर दखल विरोधीपक्षासह इतर सामाजिक संघटनांनी घेतली. विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणांचा व्हिडिओ  त्याच्या ट्विटर अकाऊन्टवरून शेअर केला. तसेच याबाबत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.

 हेही वाचाः- मुंबईत २४ तासात पतीने पत्नीची हत्या केल्याच्या दोन घटना

या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी अखेर विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणाऱ्या उर्वशी चुडावालासह५१ जणांवर  १२४ अ (राजद्रोह), १५३ ब, ५०५आणि३४ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. या घटनेनंतर उर्वशी फरार होती. तिने अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात अर्ज केला होता. मंगळवारी या अटकपूर्व जामीनाला न्यायालयाने मंजूरी दिली. उर्वशीने मुंबईव ठाण्याबाहेर जाता येणार नाही. तसेच १२ व १३ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात हजर होण्यास सांगितले आहे. त्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

० उर्वशी चुडावालाला मुंबई उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा

० न्यायमूर्ती एस.के.शिंदे यांनी उर्वशीचा अटकपूर्व जामीन २५ हजाराच्या जातमुचलक्यावर मंजूर केला 

० उर्वशीने १२ व १३ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात हजेरी लावून सहकार्य करण्याचे निर्देश

०उर्वशीने मुंबई व ठाण्याबाहेर जाता येणार नाही.

०देशद्रोही शर्जिल इमाम याच्या समर्थनार्थ दिल्या होत्या घोषणा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा