Advertisement

राज्यात ज्येष्ठ नागरीक असुरक्षीत

मुंबईत वरिष्ठविरोधातील सर्वाधिक म्हणजे एक हजार 115 गुन्हे दाखल झाले आहेत

राज्यात ज्येष्ठ नागरीक असुरक्षीत
SHARES
Advertisement

घरातील वरिष्ठ नागरीकांना आदराने वागवण्याची संस्कृती असलेल्या महाराष्ट्राला त्याच विसर पडलाय, असाच प्रश्न उपस्थित झाला आहे, कारण देशातील वरिष्ठनागरीकांविरोधात सर्वाधीत म्हणजे पाच हजार ३२१ गुन्हे महाराष्ट्रात घडले आहेत.  नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) २०१७ च्या गुन्हे आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. २०१६ च्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. राज्याची राजधानीही त्याला अपवाद नसून देशातील प्रमुख महानगरांमध्ये मुंबईत वरिष्ठविरोधातील सर्वाधिक म्हणजे एक हजार ११५ गुन्हे दाखल झाले आहेत.


ज्येष्ठ नागरीकांबाबत दाखल होणाऱया गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. २०१५ मध्ये राज्यात चार हजार ५६१ ,२०१६ मध्ये ६९४तर २०१७ मध्ये पाच हजार ३२१ २०१७ मध्ये राज्यात  १५२ वरीष्ठ नागरीकांच्या हत्या महाराष्ट्रात घडल्या. हत्यांबाबत तामिळनाडू पाठोपाठ राज्याचा क्रमांक लागतो. याशिवाय ६६गुन्हे हत्येचा प्रयत्न, २४६ गंभीर मारहाणीचे,३५५ जबरी चोरीचे व १०१५फसवणुकीचे गुन्हे वरिष्ठनागरीकांबाबत घडले आहेत. सर्वात लाजीरवाणी गोष्ट म्हणजे राज्यात २०१७मध्ये ९ज्येष्ठ नागरीक महिलांवर बलात्कार झाला आहे. केरळामध्ये सर्वाधीक म्हणजे १९ ज्येष्ठ नागरीक महिलांवर बलात्कार घडले आहेत.

मुंबईही वरिष्ठ नागरीकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये देशात आघाडीवर आहे. मुंबईत २०१७ मध्ये एक हजार ११५ गुन्हे घडले आहेत. २०१६ मध्ये १२१८गुन्हे घडले होते, तर २०१४ मध्ये ९४४व २०१५ मध्ये ११२१ गुन्हे वरिष्ठनागरीकांविरोधात घडले होते.  वयाच्या उतार वयात ज्येष्ठ नागरीकांना दररोजच्या कामासाठी नोकर व इतर व्यक्तींवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे त्यांना टार्गेट करणे, आरोपींना सोपे जाते, असे एका अधिकाऱयाने सांगितले.मुंबई पोलिसांनी ज्येष्ठ नागरीकांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी १०९० क्रमांकाची हेल्पलाईवर नोंदणी होती. या हेल्पलाईनवर दर महिन्याला किमान ५० नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरीकांचे तक्रारीचे दूरध्वनी येतात, त्यात अगदी मुले त्रास देत असल्यापासून घरात पाणी गळत असल्याच्या तक्रारीही ज्येष्ठ नागरीक करत आहेत. मुंबई पोलिसही त्यांच्यापरिने या वृद्धांना मदत करतात. 


१०९० क्रमांकावर दरमहिन्याला २५ते ३० , १०३ या हेल्पलाईनवर दर महिन्याला १५-२० नोंदणी केलेले वयोवृद्ध दूरध्वनी करून तक्रारी करतात. त्यानुसार स्थानिक पोलिसांना सांगून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा पोलिस प्रयत्न करतात, तसेच गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले जातात. याशिवाय एसएमएस व सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनही तक्रारी करण्याचा पर्यात मुंबई पोलिसांनी उपलब्ध केलेला आहे. घरात पाणी गळतेय, मुलं जेवण देत नाहीत, लाऊड स्पीकरच्या आवाजाचा त्रास होतोय, शेजारी त्रास देत आहेत अशा तक्रारी या हेल्पलाईवर येतात. गुन्हेगारी स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये पोलिस गुन्हे दाखल करतात, तर इतर प्रकरणांमध्येही वृद्ध नागरीकांना पोलिस मदत करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय वैद्यकीय सेवेची आवश्‍यकता असेल, तेव्हाही पोलिस ज्येष्ठ नागरीकांना मदत करतात.

संबंधित विषय
Advertisement