नोकरानेच पळवले 35 लाखांचे दागिने

Borivali
नोकरानेच पळवले 35 लाखांचे दागिने
नोकरानेच पळवले 35 लाखांचे दागिने
See all
मुंबई  -  

 बोरीवली पश्चिम भागातील गोराई येथे भैरुनाथ ज्वेलर्समध्ये नोकरानेच चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुकान मालकाने त्याच्या नोकरावर विश्वास टाकला व दुकान त्याच्या ताब्यात देत  काही कामानिमित्ताने राजस्थानला गेला. त्यावेळी नोकराने याचाच फायदा घेत दुकानातील 35 लाखांचं सोनं चोरी करून पोबारा केला. या संदर्भात पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम 380 आणि 379 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बोरीवलीतल्या भैरुनाथ ज्वेलर्सचे मालक रमेश बाफना यांनी दीड महिन्यापूर्वी त्यांच्या दुकानात जीतू नावाच्या एका मुलाला कामावर ठेवले होते. त्यानंतर रमेश बाफना जीतूवर विश्वास ठेऊन काही कामानिमित्ताने राजस्थानमध्ये गेले. मात्र जीतूने 10 एप्रिलला रात्री दुकानातून 35 लाखांचं सोन आणि 20 हजार रुपये घेऊन पोबारा केला.

बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांचं एक पथक फरार जीतूचा शोध घेण्यासाठी राजस्थानच्या दिशेने रवाना झालं आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.