इंद्राणीसह पीटर आणि संजीववर आरोप निश्चित

 Mumbai
इंद्राणीसह पीटर आणि संजीववर आरोप निश्चित
इंद्राणीसह पीटर आणि संजीववर आरोप निश्चित
See all

मुंबई - बहुचर्चित शीना बोरा हत्येप्रकरणी मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टाने मंगळवारी शीनाची आई इंद्राणी मुखर्जीसह पीटर मुखर्जी आणि संजीव खन्नावर आरोप निश्चित केले आहेत. इंद्राणींसह तिचा पती पीटर मुखर्जी आणि दुसरा पती संजीव खन्ना यांच्यावर शीनाच्या हत्येसह, कट रचण्याचा, अपहरणाचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. तर, मिखाईलच्या हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा कट रचल्याबाबत आरोप निश्चित करण्यात आला आहे.

एप्रिल 2012 साली शीना बोराची हत्या करून तिचा मृतदेह जाळण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी तब्बल तीन वर्ष लागली. या प्रकरणी इंद्राणीसह इतरांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत हे सगळे न्यायालयीन कोठडीत आहेत.

Loading Comments