शिवसेना नगरसेविका शितल म्हाञे आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींना धमकी

नगरसेविका शीतल म्हाञे आणि शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली होती

शिवसेना नगरसेविका शितल म्हाञे आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींना धमकी
SHARES
बोरिवलीच्या शिवसेना नगरसेविका शितल म्हाञे आणि शिवसेना प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना ट्विटरवर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी शितल म्हाञे यांनी बोरिवलीच्या एमएचबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या नगरसेविका असून मुंबई महापालिकेच्या विधी व महसूल समितीच्या त्या अध्यक्षा आहेत. तर प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकत्याच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. या दोघिंना ट्विटरवर ही धमकी आली आहे. शीतल या  नोव्हेंबर रोजी दुपारी 4:30 वा. त्याचे ट्विटर अकाऊन्ट तपासत असताना. शीतल यांना त्यांच्या ट्विटर अकाऊन्टवर ASHISH KR DWIVEDI या नावाच्या व्यक्तीने @ASHISHKRDW2  या अकाऊन्टवरून नगरसेविका शीतल म्हाञे आणि शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली होती.त्या खाली मारेकऱ्याने दोघींना गोळ्या घालून हत्या करण्याची धमकी दिली. संबंधित व्यक्तीने प्रियांका चतुर्वेदी आणि शितल म्हात्रे यांना तो मेसेज टॅग ही केला आहे. या मेसेजचा स्क्रीनशॉटही म्हात्रे यांनी पोलिसांकडे सादर केला आहे. 


या प्रकरणी नगरसेविका शीतल म्हाञे यांनी एमएचबी पोलिस ठाण्यात भादवी कलम 506(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा