तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात एक विचित्र घटना घडल्याचे समोर आले. 19 वर्षीय तरुणी महाविद्यालयात जात असताना तिच्या मागे चालणाऱ्या व्यक्तीने तरुणीचे केस कापले होते.

तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
SHARES

मुंबईतील (mumbai) पश्चिम रेल्वेच्या दादर (dadar) रेल्वे स्थानकात एक विचित्र घटना घडल्याचे समोर आले. 19 वर्षीय तरुणी (girl) महाविद्यालयात जात असताना तिच्या मागे चालणाऱ्या व्यक्तीने तरुणीचे केस कापले (hair cut) होते.

ही बाब तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने मागे वळून बघताच आरोपीने कैची बॅगेत टाकून तिथून पळ काढला. यानंतर संबंधित तरुणीने तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल करताच मुंबई सेंट्रल (mumbai central) रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासून आरोपीचा (criminal) शोध घेतला. आरोपी चेंबूर येथील रहिवासी असून त्याचे नाव दिनेश गायकवाड (35) आहे. तसेच अटक केल्यानंतर चौकशीमध्ये या गुन्ह्यामागचे अजब कारण (weird reason) आरोपीने सांगितले आहे.

रेल्वे पोलिसांचे एक पथक आरोपीच्य शोध घेत होते. घटना घडलेल्या ठिकाणी मंगळवारी सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. दिनेश गायकवाड (35) एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. तो मनोरुग्ण नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याला महिलांचे लांब केस आवडत नाहीत. त्यामुळे त्याने हा प्रकार केला. सोमवारी त्याने तरुणीचे केस कापून कैची बॅगेत टाकून पळ काढला होता.

याआधी ऑगस्ट 2024 मध्येही त्याने एका 40 वर्षीय महिलेचे केस कापल्याचा प्रकार आता समोर आला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी सामील आहेत का? आणि आतापर्यंत किती महिलांबरोबर असा प्रकार घडला, याचा पोलीस तपास करत आहेत.



हेही वाचा

समुद्रात जाणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर होणार

कुर्ला उन्नत हार्बर मार्ग वर्षभराच्या लांबणीवर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा