जेव्हा कुंपणच चोरीला जातं...

 Chembur
जेव्हा कुंपणच चोरीला जातं...

चेंबूर - येथील स्थानक परिसरात फुटपाथवरील लोखंडी संरक्षक कठडेच चोरीला गेले आहेत. पालिकेच्या 'एम' पश्चिम विभागाने दोन वर्षांपूर्वीच लाखो रुपये खर्चून चेंबूर स्थानक आणि परिसरातील रस्त्यांच्या फुटपाथवर हे लोखंडी सुरक्षा कुंपण बसवलं होते. हे कुंपण येथील फेरीवाल्यांनीच रात्रीच्या वेळी गायब केल्याचा दावा एका दुकानदाराने गुप्ततेच्या अटीवर केला आहे.

चेंबूरच्या ना. ग. आचार्य मार्ग, दयानंद सरस्वती मार्ग, एम विभाग मार्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पादचारी आणि वाहनांचीही वर्दळ असते. त्यातच फेरीवाल्यांनीही या रस्त्यांवर बस्तान मांडलंय. पादचाऱ्यांना फुटपाथ मोकळा मिळावा म्हणून एम पश्चिम विभागाने चेंबूर स्थानक परिसरातील सर्व रस्त्यांवर ही लोखंडी कुंपणं बसवली होती जी आता गायब झाली आहेत.

Loading Comments