सख्खी बहीण पक्की वैरी


SHARE

माटुंगा - क्षुल्लक कारणावरून एका बहिणीनं आपल्या कुटुंबासह भर रस्त्यात सख्या वयोवृद्ध भावाला आणि वहिनीला मारल्याची धक्कादायक घटना माटुंगा लेबर कॅम्पच्या शालिमार इंडस्ट्रीजसमोर सोमवारी रात्री घडली. या घटनेत महादेव यल्लप्पा बडदाळ (53) यांचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी शैला बडदाळ जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर अवस्थेत निपचित पडलेल्या महादेव आणि त्याच्या पत्नीला घेऊन तत्काळ शीव रुग्णालय गाठले मात्र अवघ्या काही मिनिटातच महादेव बडदाळ यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी विक्की यल्लापा आवटीगर, सूर्यकात बडदाळ, संगीता बडदाळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यातील मुख्य आरोपी लक्ष्मी यल्लापा शिवमत, जयश्री शिवमत, माळींगा आवटीगर, यल्लमा आवटीगर, अनिता राजेश शिवमत, यल्लमा आवटीगर फरार असल्याचं मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या