पतंगाने केला घात


पतंगाने केला घात
SHARES

दाणाबंदर -  छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) जवळच्या झोपड्यांना लागलेल्या भीषण आगीत 6 जण जखमी झाले होते. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 12 वर्षांचा सलमान खान 21 टक्के, 13 वर्षांचा रमजान खान 75 टक्के भाजला आहे. तर इतर मुलांमध्ये मीर, जुनेद, विनायक आणि रहमान हे 7 टक्के भाजले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार काही मुलं पतंग उडवत होते. त्यावेळी पतंग ओव्हरहेड वायरमध्ये जाऊन अडकला आणि त्यामुळे हा स्फोट झाला. ज्याची ठिणगी तिथल्या आसपासच्या झोपड्यांवर पडली. त्यामुळे आग पसरत गेली. झोपडीच्या जवळपास असलेल्या कचऱ्याच्या ढीगाऱ्यालाही आगीने घेरले. याचदरम्यान सिलिंडरचाही स्फोट झाला त्यामुळे आगीने राैद्र रुप धराण केले. त्यावेळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांसह 6 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा