कोब्राला पकडणे बेतले जीवावर

वसई - कोब्रा पकडणे हे एका सराईत सर्पमित्राच्या जीवावर बेतले आहे. नायगाव परिसरात राहणाऱ्या मोहम्मद अवेज मिस्त्री असे या 17 वर्षांच्या मुलाचे नाव आहे.

मंगळवारी दुपारी नायगाव परिसरातल्या एका इमारतीत कोब्रा साप घुसला. या कोब्राला पकडण्यासाठी इमारतीतल्या रहिवाशांनी मोहम्मद मिस्त्रीला बोलावले. मात्र या कोब्राला पकडताना त्याने अवेझच्या हातावर चावा घेतला. तरीही त्याने सापाला एका गोणीत भरलं आणि गोणी पाठीवर घेऊन तो निघाला. त्यावेळीही सापाने अवेजच्या पाठिवरही चावा घेतला. साप चावला असतानाही अवेजने सापाला जंगलात सोडले. अवेजच्या कुटुंबियांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. पण त्या रुग्णालयात आयसीयू नसल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्या दरम्यानच त्याचा मृत्यू झाला.

चार महिन्यापूर्वीही अवेजला साप चावला होता. पण त्यावेळी उपचार झाल्याने त्याचे प्राण वाचले होते. पण या वेळी कोब्राने दोन वेळा चावा घेतल्याने अवेजला वाचवणे अशक्य झाले.

Loading Comments