देवीच्या दारी सापाची हजेरी

अंधेरी - सहार रोडवरील पी अँड टी कॉलनीतील गणेश मंदिरात रविवारी सकाळी साप घुसल्याने एकच धावपळ उडाली. अखेर या सापाची सर्पच्या स्वयंसेवकांनी सुटका केली.

धिवड जातीचा हा पाणसाप सकाळच्या वेळी मंदिरात घुसला. यावेळी मंदिरात भक्तांची वर्दळ असल्याने सर्वांची पळापळ झाली. मात्र सर्प संस्थेच्या हर्षल खांडवे यांनी तिथे पोचून या सापाला पकडून त्याची सुटका केली. "हा साप जवळपास दीड फुटाचा असून, या जातीचे साप पाच फुटांपर्यंत वाढू शकतात, हे साप बिनविषारी असले तरी चांगलेच आक्रमक असतात, मंदिरात हा साप बेडूक खाण्यासाठी आला असावा" असे सर्पचे स्वयंसेवक हर्षल खांडवे यांनी सांगितले.

Loading Comments