घरपोच दारूसाठी ‘इतक्या’ जणांनी काढले आतापर्यंत परवाने

मुंबई विदेशी मद्य नियम ,१९५३ अंतर्गत ज्या दारू विक्रेत्यांकडे परवाना आहे, तेच सरकारनं घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून दारू घरपोच देऊ शकतात.

घरपोच दारूसाठी ‘इतक्या’ जणांनी काढले आतापर्यंत परवाने
SHARES

लॉकडाऊनच्या काळात सरकारने आता घरपोच दारू विक्राली परवानगी दिली असली. तरी आँनलाईन दारू मागवताना दारू पिण्यासाठी लागणारा परवाना असणे आवश्यक आहे, हे तुम्हाला माहित आहे का?  जर हा परवाना नसेल तर तुम्हाला दारू मागवता येणार नाही. सध्या महाराष्ट्रात मद्यउत्पादन, मद्यविक्री आणि मद्यसेवन यासाठी बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट लागू आहे. याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खाते करते.

काही दिवसांपूर्वी केंद्रानं दारू विकण्यास परवानगी दिली आणि दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. यातून सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारनं यावर नामी उपाय शोधलाय. दारू घरपोच देण्यास विक्रेत्यांना परवानगी दिलीय. मात्र, यासाठी काही अटीही सरकारनं ठेवल्यात. मुंबई विदेशी मद्य नियम,१९५३ अंतर्गत ज्या दारू विक्रेत्यांकडे परवाना आहे, तेच सरकारनं घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून दारू घरपोच देऊ शकतात. १ एप्रिल ते ९ जून  पर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मद्य परवान्यासाठी १ लाख ३१ हजार ३२० अर्ज आले होते. त्यातील १ लाख २६ हजार १२१ परवान्यांना मंजूरी देण्यात आली.

परवाना कुठे आणि कसा मिळवायचा

राज्यात १५ मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दुर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने  Offline पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरीता रु.१००/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.१०००/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.


अवैध तस्करी प्रकरणी गुन्हे दाखल

राज्यात १५ मे २०२० रोजी पासून ते आतापर्यंत तब्बल १३ लाख ६४ हजार ०३६ ग्राहकांनी आँनलाईन मद्यखरेदी केली आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ७ हजार ८८० अनुज्ञप्ती सुरू आहेत. माञ तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून अवैध मद्य तस्करी केली जात आहे. ही तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. १० जून २०२० रोजी राज्यात ९६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. रु.१६.८३ लाख किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर २४ मार्च, २०२० पासुन १०जून २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ७८८० गुन्हे नोंदविण्यात आले असून ३६१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ६९५ वाहने जप्त करण्यात आली असून रु.१९.५० /- कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


 त्या अटी खालीलप्रमाणे-

दारू पिण्याचा परवाना असलेल्या परवानाधारक व्यक्तीलाच संबंधित विक्रेता घरपोच देऊ शकतो.

ज्या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी किंवा काही विशिष्ट ठिकाणी संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे, अशाच ठिकाणी घरपोच मद्यसेवा दिली जाईल. Containment zone मध्ये ही सेवा देता येणार नाही.

विहीत केलेल्या दिवशी आणि वेळेत विदेशी मद्याची विक्री दुकानदार त्याच्या दुकानातून करेल.

परवानाधारकाने मद्याच्या विक्रीसाठी मागणी नोंदवली, तरच परवानाधारकास मद्याचे वितरण निवासी पत्यावर करता येईल.

घरपोच मद्य देणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून ते वैद्यकीयदृष्ट्या पूर्ण पात्र ठरले, तरच त्यांना ओळखपत्र देण्यात येईल.

मद्य घरपोच देणाऱ्या व्यक्तींनी मास्क वापरावा. वेळोवेळी हाताचं निर्जंतुकिकरण करावं. हे नियम पाळले जातील, याची दक्षता दारू विक्रेत्यानं घ्यायची आहे.

मद्य घरपोच पोहचविणाऱ्या प्रत्येक दुकानामागे कमाल दहा कामगार असतील.

मद्यविक्री ही MRP नुसार केली जावी.

मद्य मागणी करणाऱ्या ग्राहकाकडे आवश्यक मद्यसेवनासाठी परवाना नसल्यास तो www.stateexcise.maharashtra.gov.in किंवा www.exciseservices.mahaonline.gov.in या वेबसाइटवरून ऑनलाइन मिळू शकतो.

घरपोच दारू विक्रीचा हा आदेश लॉकडाऊन अस्तित्वात असेपर्यंतच लागू राहील.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा