सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात NCBनं दाखल केली चार्जशीट, ड्रग अँगलची शक्यता

१२ हजार पानांच्या चार्जशीटमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकसह ३३ आरोपींची नावं आहेत.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात NCBनं दाखल केली चार्जशीट, ड्रग अँगलची शक्यता
SHARES

ड्रग्स अँगल नंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे. ड्रग्स अँगलनं तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) नं शुक्रवारी मुंबईतील NDPS कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. १२ हजार पानांच्या चार्जशीटमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकसह ३३ आरोपींची नावं आहेत.

तसंच, ५ जण फरार असल्याची माहिती आहे. या चार्जशीटमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या साक्षींचा समावेश आहे.

चार्जशीटसोबत ५० हजार पानांचे डिजिटल पुरावे आहेत. यात आरोपींमध्ये झालेली व्हॉट्सअॅप चॅट, त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि बँक स्टेटमेंटचा समावेश आहे. याशिवाय, २०० पेक्षा जास्त साक्षीदारांच्या साक्षी यात आहेत.

या प्रकरणात NCB ने आतापर्यंत ३३ जणांना अटक केली आहे. यात अभिनेत्री रिया, तिचा भाऊ शोविक, सुशांतचा मॅनेजर सॅमुअल मिरांडा, दीपेश सावंत आणि इतर ड्रग पेडलर सामील आहेत. या प्रकरणातून मिळालेल्या पुराव्यावरुन NCB ने बॉलिवूडमधील इतर काही प्रसिद्ध अभिनेत्यांची चौकशीदेखील केली होती.हेही वाचा

ठाण्यात ४४ किलो गांजा हस्तगत

रेल्वे मार्गावरील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी मध्य रेल्वे घेणार ड्रोनची मदत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा