ठाण्यात ४४ किलो गांजा हस्तगत

पोलिसांनी बॅग्स उघडण्यास सांगताच दोन्ही आरोपी त्या बॅग्स तशाच टाकून पळून गेले. त्यांचा पोलिसांनी पाठलाग केला मात्र ते सापडले नाही.

ठाण्यात  ४४ किलो गांजा हस्तगत
SHARES

ठाण्यातील कोपरीमध्ये पोलिसांनी ४४ किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत ९ लाख रुपये आहे. पोलिसांना हटकले असता आरोप गांजा टाकून पळून गेले.  कोपरीत काही जण माल रिक्षात भरत असताना पोलिसांनी त्यांना हटकले. यावेळी आरोपी माल तसाच टाकून पळून गेले. पोलिसांनी माल तपासला त्यामध्ये गांजा आढळला. गांजाने भरलेल्या एकूण ६ बॅग्स होत्या. 

४ मार्चला कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक विभागात गस्त घालत होते. पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक साळवी आणि पोलीस शिपाई शेंडगे शास्त्रीनगर बस स्टॉप समोर, ठाणे रेल्वे स्टेशनकडून आनंद सिनेमाकडे जाणाऱ्या मार्गावर गस्त घालत होते. तेव्हा दोन इसम ६ बॅग्स घेऊन रिक्षामध्ये ठेवत असल्याचं दिसले. पोलिसांनी त्यांना हटकल्यानंतर त्यांनी बॅग्समध्ये कपडे असल्याचे सांगितले. 

पोलिसांनी बॅग्स उघडण्यास सांगताच दोन्ही आरोपी त्या बॅग्स तशाच टाकून पळून गेले. त्यांचा पोलिसांनी पाठलाग केला मात्र ते सापडले नाही. पोलिसांनी रिक्षात ठेवलेल्या बॅगेची तपासणी केल्यानंतर सहा बॅग्समध्ये ४४ किलो ६६४ किलो वजनाचा गांजा सापडला. या मालाची एकूण किंमत ९ लाख ५७ हजार २८० रुपये आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा