मुंबईच्या आसमंतात संशयास्पद वस्तू

 Pali Hill
मुंबईच्या आसमंतात संशयास्पद वस्तू

मुंबई - भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेला तणाव, मुंबईवर ड्रोन हल्ल्याचा धोका या पार्शवभूमीवर बुधवारी एअर इंडियाच्य़ा वैमानिकाला मुंबईच्या आसमंतात निळ्या रंगाची फुगेसदृश वस्तू उडताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एयर इंडियाच्या नागपूरवरून मुंबईला येणाऱ्या वैमानिकाला विमानतळाजवळ हे फुगे दिसल्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले. हे फुगे दिसल्यावर वैमानिकाने याची माहिती एयर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. त्यानंतर त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांना सतर्क केले असून, सध्या मुंबई पोलीस याचा तपास करत आहेत.

Loading Comments