वर्सोव्यातील हुक्का पार्लरवर स्वाभिमानी संघटनेचा अटॅक, दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात


वर्सोव्यातील हुक्का पार्लरवर स्वाभिमानी संघटनेचा अटॅक, दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
SHARES

बुधवारी रात्री अंदाजे साडेदहा वाजेच्या सुमारास स्वाभिमानी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी वर्सोव्यातील सिरोको कॅफे, इन्स बाय नावाच्या हुक्का पार्लरमध्ये घुसून तोडफोड केली. हुक्का पार्लरचे मालक आणि तक्रारकर्ते कौशल रश्मीकांत शाह यांच्या तक्रारीनुसार वर्सोवा पोलिसांनी २ आरोपींना अटक केली. मेहताब शेख (४१) आणि मनोज प्रकार ठाकूर (३३) अशी त्यांची नावं आहेत.


नेमकं काय झालं?

वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाभिमानी संघटनेचे १० ते १५ कार्यकर्ते बुधवारी रात्री साडेदहा ते सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सिरोको कॅफेत जबरदस्तीने प्रवेश केला. हे कार्यकर्ते हातात स्वाभिमान संघटनेचे लाल रंगाचे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी करू लागले. 

कॅफेतील कामगारांनी त्यांना अटकाव केल्यावर या कार्यकर्त्यांनी कामगारांना शिवीगाळ करून सामानाची तोडफोड केली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास सुरू करत भादंवि ४५२, १२० (ब), ५०६ (२), ४२७, १४३, १४७, १४९ अंतर्गत दोघाजणांना अटक केली.



हेही वाचा-

'हुक्कामुक्त' मुंबईसाठी नितेश राणेंची मोहीम


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा