मिर्ची पूड टाकून अज्ञातांनी लुटली कार

 Palghar
मिर्ची पूड टाकून अज्ञातांनी लुटली कार
Palghar, Mumbai  -  

पालघरमधील वाळिव परिसरात चार अज्ञात इसमांनी मिरची पूड टाकून एका व्यक्तीची कार लुटली. या प्रकरणी वाळिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश (38) हे कांदीवली परिसरात राहतो. त्याने आपली मारूती स्विफ्ट कार ओला कंपनीत नोंदवली होती. नेहमीप्रमाणे सतीश भाडं घेऊन मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सोपारा फाट्याजवळ पोहोचला तेव्हा त्याच्या मोबाईलवर मेसेज आला. गाडी थांबवून सतीश मेसेज पाहत असताना अचानक चार इसम त्याच्याजवळ आले आणि त्याच्यावर त्यांनी मिर्ची पूड टाकत त्याला मारहाण केली. मारहाणीनंतर ते नराधम त्याची कार घेऊन पसार झाले. सुमारे 3 लाख किंमतीची कार चोरीला गेल्याची माहिती देत आरोपींवर कलम 394,323,34 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबनावल यांनी दिली.

Loading Comments