स्विगी डिलिव्हरी बॉयने इमारतीत महिलेचा फोन चोरला

महिलेने चोरीबाबत अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही.

स्विगी डिलिव्हरी बॉयने इमारतीत महिलेचा फोन चोरला
SHARES

मालाडमध्ये १४ फेब्रुवारी रोजी एका अपार्टमेंट इमारतीत एका स्विगी डिलिव्हरी करणार्‍याने एका महिलेचा फोन चोरल्याचा आरोप आहे. जयराम येगडे असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे.

मालाड पश्चिम येथील अशोक एन्क्लेव्ह अपार्टमेंटमध्ये सायंकाळी ६.४५ च्या सुमारास ही घटना घडली आणि सीसीटीव्हीत कैद झाली. मात्र, महिलेने चोरीबाबत अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही.

व्हिडिओ फुटेजमध्ये, अपर्णा विनयन ही महिला घरात प्रवेश करण्यापूर्वी तिचा फोन शू रॅकवर ठेवताना दिसत आहे.

थोड्या वेळाने, डिलिव्हरी बॉय कॉरिडॉरमध्ये प्रवेश करतो आणि शेजारच्या फ्लॅटमध्ये ऑर्डर दिल्यानंतर, रॅकवर ठेवलेला फोन धूर्तपणे हिसकावून पळून जातो.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना, मुंबई पोलिसांनी ट्विट केले, "आवश्यक कारवाईसाठी शक्य तितक्या लवकर तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार करा."

स्विगीने ट्विट केले की, "कृपया संबंधित ऑर्डर आयडी आम्हाला द्या जेणेकरून आम्हाला तुमची मदत करणे सोपे जाईल.



हेही वाचा

मुंबई : लिव्ह इन पार्टनरकडून गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेह बेडमध्ये लपवला

मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला दुकानाच्या मालकाला अटक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा