• मुजोर टॅक्सीवाल्याची प्रवाशाला मारहाण
SHARE

वरळी - टॅक्सीवाल्यांची मुजोरी आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल. प्रवाशाबरोबर झालेल्या किरकोळ वादानंतर टॅक्सीचालकाने प्रवाशाला शिविगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी वरळीतील गोपाळनाका परिसरात घडली. या मारहाणीत प्रवासी पोपट रामचंद्र कुलकर्णी यांना दुखापत झाली आहे.

पोपट कुलकर्णी हे मंगळवारी सकाळी टॅक्सीने प्रवास करत होते. त्यावेळी काही कारणावरून टॅक्सीचालक आणि त्यांच्यात वाद झाला. यावेळी रस्त्यातून जात असलेल्या झाफर नावाच्या टेम्पोचालकाने भांडण सोडवण्याच्या बहाण्याने येत कुलकर्णी यांना मारहाण केली. तसेच टॅक्सीचालकानेही त्यांना मारहाण करत जखमी केले.
वाद वाढल्याने परिसरात गर्दी झाली. पोलिसही हजर झाले. पण पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य न लाभल्याने उपस्थितांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांनाही दमदाटी केली. तब्बल 1 तासाने डिलाइल रोड पोलीस स्टेशनला सदर घटनेची तक्रार करण्यात आली. त्यानंतर कुलकर्णी यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. "डिलाइल रोड पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक रचप्पा बसप्पा चांकोटी यांनी घटनेची वेळेत दखल घेतली", असे पोपट कुलकर्णी यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या