मुलुंडमधून 14 वर्षांचा मुलगा बेपत्ता

 Dalmia Estate
मुलुंडमधून 14 वर्षांचा मुलगा बेपत्ता

मुलुंड - गोविंददास रावत नावाचा 14 वर्षांचा मुलगा 2 जानेवारीपासून बेपत्ता आहे. तो मुलुंडमधला राहणारा आहे. या प्रकरणी त्याच्या पालकांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

सोमवारी सकाळी गोविंददासचे आई-वडील बाहेर गेले होते. या वेळी गोविंददास घरीच होता. मात्र संध्याकाळी घरी आल्यावर त्यांना गोविंददास घरी नसल्याचं समजलं. त्यानंतर त्याच्या वडिलांनी शोधाशोध सुरू केली. मात्र गोविंददास सापडलाच नाही. तेव्हा त्यांनी थेट मुलुंड पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. मुलुंड पोलिसांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. गोविंददासची शाळा, मुलुंडमधील सर्व परिसर, इस्पितळे या अशा सर्व ठिकाणी शोधकार्य सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी दिली आहे.

Loading Comments