कारला आग लागली पळा पळा

गोरेगाव - गोरेगाव पूर्वयेथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर संध्याकाळी साडे सातच्या सुमारास होंडा सिटी या वाहनानं पेट घेतलाय. होंडा सिटीच्या इंजिनला अचानक आग लागल्यानं ही घटना घडलीय. गाडीमध्ये अशोक चौरसीया आणि त्यांची 10 वर्षांची मुलगी प्रवास करत होती. दरम्यान गाडी पूर्ण जळाली असून यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. संध्याकाळची वेळ असल्याने थोडी ट्राफिकची समस्या उद्भवली. मात्र अग्निशमन दलानं आग विझवून वाहतूक सुरळीत केली.

Loading Comments