दहिसरमध्ये 3 लाखांचा गुटखा जप्त

 Mumbai
दहिसरमध्ये 3 लाखांचा गुटखा जप्त

दहिसर - दहिसर पोलिसांनी दहिसर चेकनाक्यावर एका टॅम्पोची तपासणी केली असता त्यातून साडे तीन लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. दहिसर पोलिसांना दहिसर चेकनाक्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका टॅम्पोत गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळाती. त्यानुसार,  त्वरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी आपल्या टीमसोबत टोलनाक्यावर येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली. तेव्हा टॅम्पो नंबर MH04 HD-6320 ची तपासणी केली असता त्यात वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा सापडला. एफडीए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार साडे 6 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसंच टेम्पो चालकाशी अधिक चौकशी करत असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Loading Comments