लाॅकडाऊनमध्ये वाहन चोरीचे प्रमाण वाढले


लाॅकडाऊनमध्ये वाहन चोरीचे प्रमाण वाढले
SHARES

 मुंबईत कोरोना संक्रमणामुळे सर्वत्र लाँकडाऊन पुकारण्यात आले. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांचा वेग मंदावला. अनेकांनी चार चार महिने आपली वाहनांकडे पाठ फिरवल्याचे पाहून भूरट्या चोरांनी संधी साधून वाहने चोरी केल्याचे पुढे आले आहे. लाँकडाऊनमुळे शिथीलता आणल्यानंतर चार महिन्यात वाहने चोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. मोटरसायकल, रिक्षा या हलक्या वाहनांपासून अवजड ट्रक, टँकर, ट्रेलर आणि अद्ययावत सुरक्षा व्यवस्था असलेल्या कार मुंबईत चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवल्यात आल्या आहेत.

हेही वाचाः- सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय?

एप्रिल, मेमध्ये कडेकोट टाळेबंदीमुळे अन्य गुन्ह्य़ांप्रमाणे वाहन चोरीचे गुन्हेही थंडावले होते. मुंबई पोलिसांच्या नोंदीनुसार एप्रिल महिन्यात ८४ तर मे महिन्यात १५८ वाहन चोरीचे गुन्हे शहरातील ९४ पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आले. मात्र टाळेबंदी जशी सैल करण्यात आली, तशा वाहन चोरणाऱ्या टोळ्या सक्रि य झाल्या. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये एक हजार १९ गुन्हे नोंद झाले. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक २९३ वाहने चोरी झाली. वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळ्या संघटित आणि आंतरराज्य पसरलेल्या असतात. त्यात वाहन चोरणारे, हे वाहन शहराबाहेरील ठरावीक टप्प्यावर पोहचवणारे, चोरीचे वाहन विकत घेणारे आणि ग्राहकाला विकणारे, अशा अनेक साखळ्या टोळीला जोडलेल्या असतात. टाळेबंदीत अत्यावश्यक सेवेशी निगडित मोजकी वाहनेच रस्त्यांवर धावत होती. उर्वरित वाहने जागेवर उभी होती.

हेही वाचाः- वाट चुकल्याने बिबट्याचा बछडा आरे कॉलनीतील गुरांच्या गोठ्यात शिरला

मुंबईत जागा अपुरी असल्याने वाहने उभी करणे ही मोठी समस्या आहे. त्यामुळे असंख्य वाहने गृह संकु लाबाहेरील रस्त्याच्या कडेला उभी के ली जातात. ही वाहने चोरणे टोळ्यांसाठी सहज सोपे ठरू शकत होते. मात्र चोरलेले वाहन अन्य ठिकणी नेऊन दडवणे किं वा शहर, राज्याबाहेर नेण्यात धोका जास्त होता. या काळात पोलिसांचा पहारा, बंदोबस्त शहरात होताच, पण प्रत्येक जिल्ह्य़ाच्या वेशीवरही तपासणी नाके उभारण्यात आले होते. रस्त्यावर धावणारी वाहने कमी आणि पोलीस जास्त, अशा परिस्थितीमुळे वाहन चोरांच्या टोळ्या थंड होत्या. मात्र गेल्या दोन महिन्यांत परिस्थिती बदलली. टाळेबंदी सैल करत एका जिल्ह्य़ातून अन्य जिल्ह्य़ांत, राज्यांत प्रवास करण्यास मुभा मिळाली. त्यामुळे शहर आणि जिल्ह्य़ांच्या वेशींवरील तपासणी नाके उठविण्यात आल्याने चोरीची वाहने शहराबाहेर किं वा राज्याबाहेर नेणे चोरांना शक्य होऊ लागले, असे गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय