अज्ञात चोरट्याचा मनी ट्रान्सफर पेढीवर डल्ला

Dharavi
अज्ञात चोरट्याचा मनी ट्रान्सफर पेढीवर डल्ला
अज्ञात चोरट्याचा मनी ट्रान्सफर पेढीवर डल्ला
See all
मुंबई  -  

धारावीतल्या 90 फूट रस्त्यावरील एसटीएम  मनी ट्रान्सफर नावाच्या दुकानावर एका सराईत अज्ञात चोरट्याने रविवारी पहाटे हात साफ करून लाखो रुपये लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मनी ट्रान्सफर दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने धारावी पोलीस या अज्ञात चोरट्याचा तपासात करीत आहेत.

धारावीत परप्रांतीयांची संख्या सर्वाधिक असल्याने धारावीतल्या 90 फूट रस्त्यावरील एसटीएम मनी ट्रान्सफर पेढीवर नेहमीच गर्दी असते. शनिवारी रात्री एसटीएम मनी ट्रान्सफरचे मालक थॉमस एडवर्ड नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून शटरला टाळे ठोकून आपल्या घराकडे निघून गेले.  एका इसमाने रविवारी सकाळी 6 वा. त्यांना फोनकरून दुकानाचे शटर उघडे असल्याची माहिती दिली. ते ऐकून धास्तावलेल्या मालकाने दुकानाकडे तात्काळ धाव घेतली आणि शटर उघडे पाहून ते हबकले. त्यांनी दुकानातील टेबलचे ड्रॉवर तपासले असता ड्रॉवरमधील 4 लाख 26 हजारांची रोकड गायब झाल्याचे पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. 

त्यांनी तात्काळ धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावेळी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता बनियान हाफ चड्डी घातलेला एक अज्ञात चोरटा बनावट चावीने शटर उघडून आत प्रवेश करून टेबलचे ड्रॉवर उघडून रोकड खिशात भरताना दिसत आहे. या अज्ञात चोरट्याची ओळख अद्याप पटली नसून, धारावी पोलीस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.