नमाज सुरू असताना चोरी

 Kidwai Nagar
नमाज सुरू असताना चोरी
नमाज सुरू असताना चोरी
See all

वडाळा - किडवाईनगर परिसरातल्या हिलाल मस्जिदमध्ये नमाज सुरू असताना चोरीची घटना घडली आहे. शुक्रवारी नमाज सुरू असताना एका सराईत चोरट्याने मस्जिदमध्ये घुसून हजारो रुपयांच्या रोकडसह किमती सामान घेऊन पोबारा केलाय. याविरोधात रफी अहमद यांनी किडवाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.

शुक्रवारी एक अज्ञात इसम मस्जिदमध्ये घुसला आणि इमाम साहेबांच्या दरवाज्याची कडी, कपाटाचा दरवाजा तोडून हजारो रूपयांची रोकड आणि अनेक किमती सामान घेऊन पोबारा केला. नमाज सुरू असल्याने या चोरट्याने डाव साधला. नमाज संपल्यावर चोरीची घटना उघडकीस आली. या बेडर चोरामुळे धास्तावलेल्या मस्जिदच्या विश्वस्थांनी संपूर्ण मुंबईतील मस्जिद ट्रस्टींना या चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सर्व मस्जिदमध्ये पाठवण्यात आले आहे.

Loading Comments